Posts

Showing posts from 2018
अंतर मन माझं जाणलस कधी, तर लागेल तुला माझी सर, न संपणारे , पुस्तक मी वाचत जाशील तशी ओळख पटेल वाचता वाचता ओढत तू जाशील पण हे पुस्तक कधीही न संपणारे वाटेल तुला, ओळखू तू मला लागलास, त्यानंतर पुस्तकाचे दुसरे पान मी उल्टेन अवघड वाटेनं मी तुला ,  अशब्द तू होशील वाटेल आता नको हे पुस्तक त्याक्षणी हे पुस्तक असेल तसे उभे असेल तुझ्या दृष्टीस........
  ' मन वेडे वृक्षासारखे' मन वेडे वृक्षासारखे कधी भरभराट पानाचा, तर कधी पांनाविना सुकलेले ते  अबोल वृक्ष...... तसेच आहे मनाचे , कधी असतो भरभराट आनंदाचा, तर कधी असतो , दुःखाचा ओझर.... मन वेडे वृक्षासारखे; वृक्षास जेव्हा हानी होते, तेव्हा त्यांचा दुःखाचा,  दिकात बरसाव होतो....... असच आहे वेड्या मनाचे, मनाला जेव्हा वाईट वाटते, तेव्हा डोळ्यातून नकळत  पडतात ते अश्रू........ 'मन आणि वृक्ष ' असो दोन वेगळे सूत्र , पण कळत नकळत  दोघांचे ;सुख व दुःख  जीवनाची अबोल परिभाषा  बोलत जातात..........
' ती ' समुद्राच्या काठी बसून रेखाटते ती चित्र समुद्राचे, केसात सफेद ऑर्किड  आणि हातात तिच्या पेन्सिल सूर्याची मावळती किरणे झुळूक मंद वाऱ्याची, वारयासंगे हळुवार डोले ते तिचे केस, चित्र आहे ती रेखाडते एक सुंदर समुद्राचे, लाटांच्या सुराने ओठ तिचे गाती एक मधुर गाणे, पक्षी होते चालले आपल्या घरटयापाशी, तल्लीन होऊन बनवते ती चित्र एकांतात समुद्रावरती, मावळत्या सूर्याचा किरणाने तोंडावर तेज हा तिच्या उमटला, पाहताच तिचा सोंदर्यास, मन हे लुभवेल एक चित्र , समुद्र, लाटा,हवा व शांत ते तिचे प्रतिबिंब 👩
ओळख माणसाला ओळखणे, आता झाले आहे कठीण खोटारडेपणा , दुबळे, मुखवटे सगळ्यांनी आता, ओढलेले गुपीत असे त्या चेहऱ्यापाठी, अनेक रहस्य  दडलेले विश्वास ठेवणे, आता वाटू लागले आहे महागडे दूनियेसमोर एक व अस्तित्वात दुसरे , दोन ते चेहरे सर्वांनी ओढलेले कोण खरे , आणि कोण खोटे, आता ओळखणे कठीण झाले आहे!!
वाढदिवस आयुष्याची आणखी एक पायरी मी चढले, पाऊल - पाऊल काही तरी मी शिकले, सुखाच्या घडामोडीत, दुःखाची ही पायरी मी चढले..... वाढदिवसाच्या निमित्ताने, भरभरून मी हसले, हसता हसता जाणवले, आयुष्याची आणखी एक पायरी मी चढले..... कळत नकळत मी चांगल्या गोष्टी शिकले, चांगल्या वाईट गोष्टीत अंतर करणे मी शिकले.... वाढदिवसाच्या दिवशी देवाला माझे नमन, तुझी कृपा अशीच माझ्यावर आणि सर्वावर राहू दे.
माणूस, श्रीमंत किंवा गरीब नसतो, असतात ते माणसाचे विचार, श्रीमंतीत आणि गरिबीत तोलतो, तो पण माणूसच असतो.... कर्म माणसाचे चांगले किव्हा वाईट, त्याने बोधला जातो माणूस पैसा पुष्कळ जरी असला तरी माणुसकीचा वास असलाच तर तो माणूस पूर्णपणे धनवान असतो.... गरिबीत आपल्या , भाकरीचा घास , दुसऱ्यांना भरवणारी ती असते माणुसकी...... एकमेकांना कमी मोठे लेखणे, दुष्ट वृत्तीने दुसऱ्यांना वागवणे त्यात आनंद साधणे अमानुष वृत्ती दाखवी..... देवाचा वास जेथे असतो , तेथे माणूस माणुसकी त वाढतो.. व माणसात देवाचे प्रतिबिंब झळकते....
   'दोन पक्षी ' एका झाडांच्या फांदिवरती, बसले होते , दोन पक्षी... दोघांचे रंग होते अनोखे, गडद पिवळा आणि काळा त्यांचा रंग व चोच होती लाल... स्वप्न त्यांची होती निरनिराळी, एका फांदीवरून , दुसऱ्या फांदीवर उडणे होते चालू.... विचार उडता उडता , होता त्यांचा ठाम, स्वप्न गाठायचीत आहे आता, उडता उडता आभास हा त्यांना झाला.... स्वप्न आमची निरनिराळी पण सोबत असेल जेव्हा एकमेकांची, तर गाठू आम्ही ती आपली स्वप्ने.... एकमेकांना देऊ भरपूर प्रोत्साहन आणि देऊ आता, पंखांना एकत्र भरारी....🐤🐤

Netravali Goa🏕️🏞️

   'नेत्रावळी सांगे' 'निसर्गरम्य केरी ' तुम्ही ऐकल असणार, तसच आहे हे ' निसर्गरम्य नेत्रावळी' हिरवीगार शालू नेसलेली ' नेत्रावळी 'सांगे तालुक्यात वसलेली अवती भोवती गार हवा थंड ते वातावरण मनाला उत्साह देई.... सतत बुड बुड  करणारी ती 'बुडबुड नदी ' सावरी मैनापी जसे लांबलचक धबधबे छोटी मोठी नळयाची घरे आणि दुर दूर जाणारे वेडे वाकडे रस्ते.... शेती उसाची मळे त्यांची पोटे सांभाळतात, लोक इथले साधे सरळ माणुसकी झळकते त्यांच्यात....    कूळ!गरे तळी ह्या गोष्टी नेत्रावळीची शोभा वाढवी, स्पायस ऑर्किडची फार्म मोठी मोठी...... रबराचे पलांटेशन, डोळ्यांना गारवा देणारे, वॅक्स फ्लॉवर जसे मेण कधी न विरघळणारे उसाचा रस आणि आंबट ती भिंडीची सोले... थंडगार हवा ,झाडाची छाया, दत्तगुफा,महालक्ष्मी ,वेताळ अशी प्राचीन मंदिरे व पांडवांची एक गुफा .... सर्व काही मनमोहक लांब जरी हे गाव असले पण परत परत तेथे जाण्याची इच्छा होते.... त्यात नेत्रावळीचे विशाल अभ्यारण्य व छोट्या मोठ्या झरी थंड व गोड पाणी, शाळा , पंचायत हे मिळून हे नेत्रावळी गाव....
समुद्र🏝️ समुद्राचा काठावर बसून, विचार मी करते, किती हा अपार समुद्र आणि माणूस किती छोटा.....       लाटांवर नाचणाऱ्या सुंदर होड्या, काही छोट्या काही मोठ्या, आणि त्यात रंगीबेरंगी रंगाचे लोक आणि ही मंद हवा आणि खारट ते पाणी...... शुभ्र- काळ्या घोड्यावरती लोकांची स्वारी, आणि संध्याकाळचा मावळणरा सूर्य देतो एक अशा, उद्या येऊ नव्याने...... काही गोष्टी डोळ्यांत साठवू तर काही गोष्टी केमेरामध्ये कैद करू आणि समुद्राचा आनंद , प्रत्येक क्षणी नव्याने घेऊ,......🏝️🏖️
उंच उंच डोंगर, मळबाला झेप घेती, रंगी बेरंगी फुलपाखरे, स्वच्छंद बागडती...         पावसाळी धुके,         मनाची स्फूर्ती वाढवते,         मन हे माझे,        ' कवियत्री' स्वताला म्हणते.... कोमट अशा वातावरणात, पक्षांचा किलबिलाट, आणि मोरांचा झुंजार तो नाच ....              गती हृदयाची वाढवे,              नयनी पुषपित करून,              डोलणे ते केसांचे,              आणि मनात मृदंग चाललेला तो नाच..... निसर्गाची ही साथ, एकटेपणा मिटवी, मन प्रफुल्लित करून कविता छान सुचवी.......
'माणुसकी' अनेक ज्ञाने देणारी, ती माणसे भरपूर वाट्याला येती ...     जे खरे असती     ते संकटात खंबीर     सोबत उभे रहती... भाषणे , ज्ञान, सल्ला अनेक देती पण खंबीर साथ ज्याची, तीच खरी व्यक्ती...     संकटात सोडून जाणे ,     तोडती माणूस जाती,     क्रूर , भित्रेपणाचे     वस्त्र ते ओढती...... नाते जुळले माणुसकीचे, तर होईल रे प्रगती.....          माणसाला माणुसकीचा          विसर न कधी पडो...           तर राहील सर्वत्र            ती सुख शांती.
स्वातचे त्रासदायक विचार, तुला लावी  वेड माणसा,जरा जपून विचारचक्र हे मोठे कधी वादळी , कधी खोटे, कधी सोपे तुडुंब विचाराचा होईल तुला त्रास.. त्रासदायक विचाराने चिंतन चांगले , होईल ते बंद श्वास कोडून आतमध्ये होईल घुस्पा गोंधळ मग काय, शेवटी त्रासदायक विचाराचे वादळ ते, अवघे बारा महिने २४ तास....
सुरवात प्रेमाची असते रुचकर, प्रत्येक गोष्ट प्रेमाची वाटते चांगली चांगली, मग तो भांडण्याचा खेळ तो पण खेळ संपतो प्रेमाने, मग येतो, प्रेमात चिंभ भिजून आनंदात नाचण्याचा , ती ही वेळ निघते झटपट मग येतो तो  दुरावा... मग असतो 'तुझ माझं ब्रेकअप चा ' शेवटचा नाच...😂😁
मोर बघताच त्याला मुलं मारतात उड्या, तो बघा ,'मोर , मोर' पिसारा त्याचा लांब लांब आकर्षित करणारे ते रूप  थिरकत थिरकत  पिसर्यासोबत चालणे  ती त्याची बिनधास्त चाल.. डोक्यावरती तोरा, डोळे जशे , नाजुकशा  कळ्या नजर त्याचा वरून उठेना  फुलोंनी पिसारा , नाचतो वेडा पिसा  वसंत ऋतूत त्याचा  तो देखणी नाच  मनाला लुभावतो .. पाहिजे सर्वांना मोरपिशी  रंगाचे कपडे, साडी किवा सलवार आणि कांनातले पण  मयूर आकृतीचे मोर जसा मनमोहक, तो त्याचा क्रेझ कधी न संपणारा  प्रत्येक क्षन्ही, बघताच त्याला  तोच आनंद प्रत्येक वेळा ... पूर्ण दिवस , निघतो छान जेव्हा पाहते मी एक 'मोर'....
ती  तो भेटतो स्वपंनात तिला, रूप सुंदर   तसेच तिचे गुण ही सुंदर गाते भेधुंदित, नाचते मनमोकळी बोलते पटपट आणि हसते खट्याळ.. थोडी लाजरी, थोडी भावूक,  थोडी मस्ती आणि भरपूर तिची ती बडबड.. मन आणि रूप दोन्ही सुंदर साजुकशी बाऊली , गोड तिचा स्वभाव आणि कोमल तिचा भावना... अंतर मन, तिचे झाकले,   तर हुदयात गोधळ ती घालेल... अशीच ती येवून  भेटते दररोज , ती; त्याला स्वपनात.......
रात ही पिशी कशी, रोखडीच काबार जाता, सोपना असली भयानख  माका जागी करता सुट़येचा ह्या तेपान  निहदचे बारा बारा वरां पुण रात ही पिशी बेगीन ती सोपता भयानक सवपना मदीच शीळ घालता ज़ाग ही माका हाडटा दचकून हांव जागे जाता! जाल्यार रात ही पिशी रोखडीच ती सोपता! भयानक सोपना पडून निहद माजी वयता केन्ना परत निह्द लागतली म्हाका वाट हांव आता पळयता, जाल्यार रात ही पिशी रोखडीच गे कित्याक  काबार जाता???
      जाणवाय  जाणवाय आपली आपली, जाण एकलो एकलो आपल्या बुधवंत समजता  ते म्हाका कळटा, हे म्हाका कळटा, अशो बडायो आता सगळीं मारता आपूणच तो बुधदवत बाकीची सगळीं उणी, माहज्या सारको  ना आता दुसरो कोंणी थंय थंय करूंन गर्वन नाचपी, आपल्याक समजता  तो मोर  पुण मनांत , भरल्यात तरी  वायट कितले चोर ! गर्वाचे प्रदरषन , आणी पैशाचो नेट  आणी जण एकलो  म्हण्टा आपुनच श्रेष्ठ .....
ते नभही बोलतात ते नभही फार काही बोलतात, पाहिलं आहे त्यांना  एकमेकांशी बोलताना  पावसाळ्यात बडबडगीत कसे ते गातात, घडाघडा पावसात  होतो त्याचा वर्षाव उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात नभ शेजारी शेजारी घर करतात गप्पा ते मारतात सूर्यपशी  जावून लाजत खेळत  ते भिडतात एकमेकाशी, नभहि बोलतात माणसाशी, झाडांशी पशु- पक्षा च्या संगे मानाल तर देव नाही तर दगड तसच आहे नभाच  आनंदी विचलित असेल मन  तर दिसते , नभाचे विविध आकार  नाही तर म्हणाल ते नभही बोलत नाही.........
      तोंड बंद बंद ते तोंड  होणार नाही.. कधी न बोलणारी तोंडे ती एकदाच बोलतात व सर्वांना अमुख्क करून टाकतात..                     जी पहिल्यापासून बोलून                       बोलून आलेली ,                       त्यांना कसं बंद करायला                        लावता तुम्ही तोंड? किती हे अवघड, बोलण्यासाठीच  तर देवाने  दिले आहे हे तोंड..                      कस बरं तोंड बंद ठेवायचं?                       बोलोलो नाही तर                       आता लोकपणं म्हणतील                        हिची तब्...
        चार बहिणी🙎🙎🙎🙎 नाते रक्ताचे भांडता त, हसतात, खेळतात त्या चार बहिणी मिळून मिसळून राहतात संसारची दृष्ट लागेल  अशी म्हणते आई लोकां पुढे नका मिरवू  तुमचा एकवट            एकमेकांना समजावणे,            संगतीत रडणे             हसणे,भांडणे              मतभेद होणे             व त्या थोड्याशा क्षणात            रुसणे व हळूच जावून              परत कट्टी फू करणे, लहानपणा पासून एकांमेका सोबत मोठे होणे व एकवठीने जगणे आणि मग एकाएकीचे लग्न होऊन घरातून  दुर ते जाणे ....               घरापासून जरी दूर असली                तरही त्या चार बहिणी चे                 प्रेम कधी न कमी होणा...
Image
आठवणी शब्दांत सांगता येत नाही , हृदयात कोरलेल्या त्या आठवणी, तुला पाहताच मन हरपून जाई , तुझी एक चाहूल माझ्या ओठांवर एक हलकीशी हास्य घेऊन येई, एक-एक दिवस आठवणीत भिजून जाई, केव्हा दुसर्यांदा भेट होईल आणि ते क्षण आठवणीत राहील.........