अंतर मन माझं
जाणलस कधी,
तर लागेल तुला
माझी सर,

न संपणारे ,
पुस्तक मी
वाचत जाशील
तशी ओळख पटेल

वाचता वाचता
ओढत तू जाशील
पण हे पुस्तक
कधीही न संपणारे

वाटेल तुला,
ओळखू तू मला लागलास,
त्यानंतर पुस्तकाचे
दुसरे पान मी उल्टेन

अवघड वाटेनं
मी तुला ,
 अशब्द तू होशील

वाटेल आता
नको हे पुस्तक
त्याक्षणी हे
पुस्तक असेल
तसे उभे असेल
तुझ्या दृष्टीस........

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view