'असे शिकावे धडे आयुष्याचे'
कालच एका स्त्रीची
गाठ माझी झाली,
४५ वाषॉचा
अनुभव गाठलेली

आपल्या कविता लिहिणारी,
अभंग रचणारी,
कथा लिहिणारी
अनेक स्वपने
तिच्या चेहर्‍यावर
झलकत होती

मुलाला आईच
लिहिणं लाज्यस्पद वाटे
पण तिचे ते
आयुष्याकडे पाहण्याचा
दृष्टीकोन फारच
साधा आणि सरळ

म्हटलं तिनं 'शिक्षण आणखी
थोड फार होत जरी मला
तर गाठलं असत
सर्व काही'

लेख आपले पेपरात
छापण्यासाठी तिची
ती तळमळ,

लईराई देवीची
मोठी ती भक्त
लिहिते अनेक अभंग
लईराईच्या आशीर्वादाने

तोरणे करते अनेक
'लईराई आणि गणपतीच्या' नावाने
कला भरली आहे
अनेक तिच्या अंगांमध्ये

स्वप्नांना कधी
पंख मिळेल?
हया आशेत
वय आता
पुढे सरते आहे
ह्याची काळजी नसणारी

महत्वाकांक्षी व कठीण
श्रम करणारी
भेटली मला एक स्त्री

अशा ह्या स्त्रीकडून
फार काही शिकावं
माणसानं
स्वपन पाहावी
डोळेभरून वव
त्यांना कराव साकार
कठीण परिश्रमांने

वय जरी सरत
असेल पुढे
तरी स्वपनांना
गाठायचे ठामपणे. 

Comments

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view