माणूस, श्रीमंत किंवा गरीब
नसतो,
असतात ते माणसाचे विचार,
श्रीमंतीत आणि गरिबीत तोलतो,
तो पण माणूसच असतो....

कर्म माणसाचे चांगले किव्हा वाईट,
त्याने बोधला जातो माणूस
पैसा पुष्कळ जरी असला तरी
माणुसकीचा वास असलाच तर
तो माणूस पूर्णपणे धनवान असतो....

गरिबीत आपल्या ,
भाकरीचा घास ,
दुसऱ्यांना भरवणारी
ती असते माणुसकी......

एकमेकांना कमी मोठे लेखणे,
दुष्ट वृत्तीने दुसऱ्यांना वागवणे
त्यात आनंद साधणे
अमानुष वृत्ती दाखवी.....

देवाचा वास जेथे असतो ,
तेथे माणूस माणुसकी त वाढतो..
व माणसात देवाचे प्रतिबिंब झळकते....


Comments

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view