वाढदिवस
आयुष्याची आणखी एक
पायरी मी चढले,
पाऊल - पाऊल काही
तरी मी शिकले,
सुखाच्या घडामोडीत,
दुःखाची ही पायरी मी चढले.....

वाढदिवसाच्या निमित्ताने,
भरभरून मी हसले,
हसता हसता जाणवले,
आयुष्याची आणखी एक
पायरी मी चढले.....

कळत नकळत
मी चांगल्या गोष्टी शिकले,
चांगल्या वाईट गोष्टीत
अंतर करणे मी शिकले....

वाढदिवसाच्या दिवशी
देवाला माझे नमन,
तुझी कृपा अशीच माझ्यावर
आणि सर्वावर राहू दे.

Comments

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view