' ती '

समुद्राच्या काठी बसून
रेखाटते ती चित्र समुद्राचे,
केसात सफेद ऑर्किड 
आणि हातात तिच्या पेन्सिल

सूर्याची मावळती किरणे
झुळूक मंद वाऱ्याची,
वारयासंगे हळुवार
डोले ते तिचे केस,

चित्र आहे ती रेखाडते
एक सुंदर समुद्राचे,
लाटांच्या सुराने
ओठ तिचे गाती
एक मधुर गाणे,

पक्षी होते चालले
आपल्या घरटयापाशी,
तल्लीन होऊन
बनवते ती चित्र
एकांतात समुद्रावरती,

मावळत्या सूर्याचा किरणाने
तोंडावर तेज हा तिच्या उमटला,
पाहताच तिचा सोंदर्यास,
मन हे लुभवेल

एक चित्र , समुद्र, लाटा,हवा
व शांत ते तिचे प्रतिबिंब 👩

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view