ओळख
माणसाला ओळखणे,
आता झाले आहे
कठीण

खोटारडेपणा , दुबळे,
मुखवटे सगळ्यांनी आता,
ओढलेले

गुपीत असे
त्या चेहऱ्यापाठी,
अनेक रहस्य
 दडलेले

विश्वास ठेवणे,
आता वाटू लागले आहे
महागडे

दूनियेसमोर एक
व अस्तित्वात दुसरे ,
दोन ते चेहरे
सर्वांनी ओढलेले

कोण खरे ,
आणि कोण खोटे,
आता ओळखणे
कठीण झाले आहे!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view