तोंड बंद
बंद ते तोंड
होणार नाही..
कधी न बोलणारी तोंडे
ती एकदाच बोलतात व
सर्वांना अमुख्क करून टाकतात..
जी पहिल्यापासून बोलून
बोलून आलेली ,
त्यांना कसं बंद करायला
लावता तुम्ही तोंड?
किती हे अवघड,
बोलण्यासाठीच तर देवाने
दिले आहे हे तोंड..
कस बरं तोंड बंद ठेवायचं?
बोलोलो नाही तर
आता लोकपणं म्हणतील
हिची तब्येत ठीक नाही वाटतं...
बिंद्धास्त दुसऱ्यांची चिंता
न करता बोलणे,
ही तिची एक कला...
सोडायच बोलणे
हे नाही तिला खपणार
' विचित्र ती माणसं'
दिसतात तिला,
' जे होकार आणि नकरात'
ह्याचा पुढे त्यांचा आवाजपण
येत नाही...
बोलून बोलून जर
थकले ते तोंड
तरी नाही तिला फरक पडणार...
मनात नाही रुसवा
आणि ओठावर नेहमी असतो
बतिशीचा हसवा....
बोलता बोलता मन ती
करते रिकामी
आणि बोललेच नाही तर
घुस्पडतो तिचा तो श्वास......
Great job
ReplyDelete