ते नभही बोलतात
ते नभही फार
काही बोलतात,
पाहिलं आहे त्यांना
एकमेकांशी बोलताना
पावसाळ्यात बडबडगीत
कसे ते गातात,
घडाघडा पावसात
होतो त्याचा वर्षाव
उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात
नभ शेजारी शेजारी
घर करतात
गप्पा ते मारतात
सूर्यपशी जावून
लाजत खेळत
ते भिडतात एकमेकाशी,
नभहि बोलतात
माणसाशी, झाडांशी
पशु- पक्षा च्या संगे
मानाल तर देव
नाही तर दगड
तसच आहे नभाच
आनंदी विचलित असेल मन
तर दिसते , नभाचे विविध आकार
नाही तर म्हणाल
ते नभही बोलत नाही.........
👏
ReplyDeleteBeautiful
ReplyDeleteAwsum 👍
ReplyDelete