उंच उंच डोंगर,
मळबाला झेप घेती,
रंगी बेरंगी फुलपाखरे,
स्वच्छंद बागडती...
पावसाळी धुके,
मनाची स्फूर्ती वाढवते,
मन हे माझे,
' कवियत्री' स्वताला म्हणते....
कोमट अशा वातावरणात,
पक्षांचा किलबिलाट,
आणि मोरांचा झुंजार
तो नाच ....
गती हृदयाची वाढवे,
नयनी पुषपित करून,
डोलणे ते केसांचे,
आणि मनात मृदंग चाललेला तो नाच.....
निसर्गाची ही साथ,
एकटेपणा मिटवी,
मन प्रफुल्लित करून
कविता छान सुचवी.......
Comments
Post a Comment