'दोन पक्षी '
एका झाडांच्या फांदिवरती,
बसले होते ,
दोन पक्षी...

दोघांचे रंग होते
अनोखे,
गडद पिवळा आणि काळा
त्यांचा रंग
व चोच होती लाल...

स्वप्न त्यांची होती निरनिराळी,
एका फांदीवरून ,
दुसऱ्या फांदीवर
उडणे होते चालू....

विचार उडता उडता ,
होता त्यांचा ठाम,
स्वप्न गाठायचीत आहे आता,
उडता उडता आभास
हा त्यांना झाला....

स्वप्न आमची निरनिराळी
पण सोबत असेल जेव्हा
एकमेकांची,
तर गाठू आम्ही
ती आपली स्वप्ने....

एकमेकांना देऊ
भरपूर प्रोत्साहन
आणि देऊ आता,
पंखांना एकत्र भरारी....🐤🐤

Comments

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view