बालपण बालपण तिचे कधी बालपण नव्हते, मोठी झाली ती जबाबदारीच्या गाठीत... बाहुली- बाहुल्या पहिल्या तिने दुसऱ्यांच्या हातात, कधीही नाही, खेळली ती.... खेळणे , ल्हान मुलांसारखे लाडात येणे हे कधीही नाही , जाणले तिने.... वाढत गेली, मोठी ती आता झाली, बालपण गेले असेच शहाणी ती झाली .... संसाराच्या ओडताडीत कधी मोठी झाली ती; कळलच नाही तिला, पाठीमागे वळून बघते तर ,बालपण ते हरवलेलं....
Posts
Showing posts from 2019
- Get link
- X
- Other Apps
पुरे ग! तुझा ' मी ' पणा बहिण माझी म्हणाली मला,👩 नको मिरवू तुझा ' मी ' पणा का सतत आपली तू तारीफ करतेस?? सतत मी आणि मी असतात ना लोकपण हुशार, मग का हा रुतबा तुझा? मी तिला सांगितलं उत्तरात ' बघ तस काही नाही ग, मला माझ्या स्वतःचा आभास आहे झाला.... मी नृत्य चांगले करू शकते, गाते पण छान आणि कविता चांगल्या करू शकते..... आणखी ह्या सगळयांचा आभास झाला मला एवढ्या वर्षानंतर तर मग का नाही महणायच ग एकदा तरी?? माहिती आहे जगात भरपूर बुद्धिवंत माणस आहेत तुझी बहिण सुधा एक दिवस होईल ना ग तशी !! ठा ऊ क आहे गर्वाचे घर नेहमी असते खाली म्हणून बघते ना मी नेहमी माझ्या पायाकडे... गर्वाता मी माजणर नाही, तुम्हाला कधी विसरणार नाही, ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांची आयुष्यभर आभारी मी असेन... ठेवा विश्वास बहिणीचा तुमचं पण नाव शिखराला पोहचल्याशिवाय ती राहणार नाही 😁🙂
- Get link
- X
- Other Apps
मासे 🐟🐟 कोणी मासे देता का हो मासे?? फॉर्मालीन न मिसळता? देता का हो मासे? ताजे टवटवीत रुचकर ते मासे!! कस बर जगायचं माणसानं? मास्या शिवाय कसे उतरेल ते दोन जेवणाचे घास?? कस बर खायचं फॉर्मलीन मिसळलेले मासे मास्या शिवाय जेवण हल्ली नाही घशात उतरत... देता का हो मासे फॉर्मालीन न मिसळता गहिवरला जीव हा आता मासे नसताना कोणी देता का हो मासे ताजे ,फॉर्मालीन नसताना??
- Get link
- X
- Other Apps
मी देव पाहिला 🙏 जगत होते बेभान विसरुनी माझे भूतकाळ, ठाऊक होते मला देवाने हे जग घडविल... अस्वस्थ होते मन गेले देवाचा भेटीस देवाला करून नमन बसले होते नदीचा काठी..... चिंतेत मग्न होऊन पाण्यात पाय मी बुडविले, ठरवलं पायांना द्दयचा छान पेडीक्युर.... म्हणून उचलला एक दगड पहिल्याच मुठीत काढला मी एक छानसा दगड पाहते तर काय! हाती आली गजानन महाराजांची एक उत्कृष्ट मूर्ती... मनात आनंदाचा झाला बरसावा उभी होती मित्र माझी मोठ्याने मी गडगडाट हो घातला,' देव भेटला ,मला देव' आनंदाने भरले माझे नयन विघ्न आता जाईल हरून.... मैत्रीण म्हणाली,नको आता चिंता करुस , प्रत्यक्ष सुखकर्ता दुःखहर्ता तुझ्या हातात.... आणखी काय हवे ? सर्वस्व भेटल्याचा अनुभव मला झाला 🙏 होय त्या दिवशी देव मला भेटला आणि देव असल्याचा विश्वास मला बसला..... विचलित ते माझे मन प्रसन्न हो झाले...
- Get link
- X
- Other Apps
आंबा🍋🍋 असावी सुंदर लांब लचक आंब्याची बाग... त्या बागेत आंबे दुर दुर पर्यंत झाडावर व खाली पडलेले...... गोडस, आंबट हापूस, केसर,मांनकुराद सर्व प्रकारचे आंबे..... टोपल्या भरून जाव्यात अनेक पण आंबे कधी न संपणारे.... आंब्याचा बागेत , मंद हवेत नजर टाकावी तिकडे आंबेच आंबे..... खात आंबे राहायचे, सकाळ संध्याकाळ कधी ना कमी व्हावी आंब्याची ही आस .... आंबेच आंबे , दृष्टी पडेल तिकडे व त्यात बसून घ्यावा आंब्याचा आस्वाद......
- Get link
- X
- Other Apps
स्वाभिमान स्वाभिमान आहे , पण गर्व नाही प्रत्येक कामात प्रयत्न पणाला लावून काम करेन पण झुकणार नाही... शेवटी खूपच गरज भासली तर घेवू, थोडीशी मदत, पण माझ्या स्वाभिमानाला गर्व नका समजू... माझा स्वाभिमानच आहे माझा अभिमान पण केव्हा झुकावे हे ही आहे मला ठाऊक.... वाटत असेल बदलावे हिने, तर मग मी म्हणेन, दुसऱ्यांना पाहण्याचा दृष्टिकोन तू आता बदल आणि जमल तर स्वतःच थोडस बदल....😁😉
- Get link
- X
- Other Apps
पक्षी नाही मी, कोणाचा घरट्यातली, अडवू नकोस मला बेभान उडणे मला आवडते रोखू शकत नाही कोणी मला.... उंच झेप मी घेईन नाही मला कोणाचीही भीती, क्ष्त्रायांनी रक्त आहे माझ्यात... स्वप्नांची आता घेईन मी एक उंच भरारी... जगेन थाटाने नका अडवू मला, ध्येय माझे स्वप्नांनाना देइंन पंख नवे अति रोख टोक झाडू नये..... बांधून मला पिंजऱ्यात नका आता माझी स्वप्नं तुम्ही मोडूत शेवटी घेइंन मी आता आकाशात एक उंच भरारी आणि देइंन मी आता माझ्या स्वप्नांना पंख हे नवे..........