बालपण
बालपण तिचे कधी
बालपण नव्हते,
मोठी झाली ती
जबाबदारीच्या गाठीत...

बाहुली- बाहुल्या
पहिल्या तिने
दुसऱ्यांच्या हातात,
कधीही नाही,
 खेळली ती....

खेळणे ,  ल्हान मुलांसारखे
लाडात येणे
हे कधीही नाही ,
जाणले तिने....

वाढत गेली,
मोठी ती आता झाली,
बालपण गेले असेच
शहाणी ती झाली ....

संसाराच्या ओडताडीत
कधी मोठी झाली ती;
कळलच नाही तिला,
पाठीमागे वळून बघते 
 तर ,बालपण ते हरवलेलं....

Comments

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view