स्वाभिमान
स्वाभिमान आहे ,
पण गर्व नाही
प्रत्येक कामात
प्रयत्न पणाला लावून
काम करेन पण
झुकणार नाही...
शेवटी खूपच गरज
भासली तर घेवू,
थोडीशी मदत,
पण माझ्या स्वाभिमानाला
गर्व नका समजू...
माझा स्वाभिमानच आहे
माझा अभिमान
पण केव्हा झुकावे
हे ही आहे मला ठाऊक....
वाटत असेल बदलावे हिने,
तर मग मी म्हणेन,
दुसऱ्यांना पाहण्याचा दृष्टिकोन
तू आता बदल
आणि जमल तर स्वतःच
थोडस बदल....😁😉
After a long time ur beautiful words
ReplyDelete