'दोन पक्षी ' एका झाडांच्या फांदिवरती, बसले होते , दोन पक्षी... दोघांचे रंग होते अनोखे, गडद पिवळा आणि काळा त्यांचा रंग व चोच होती लाल... स्वप्न त्यांची होती निरनिराळी, एका फांदीवरून , दुसऱ्या फांदीवर उडणे होते चालू.... विचार उडता उडता , होता त्यांचा ठाम, स्वप्न गाठायचीत आहे आता, उडता उडता आभास हा त्यांना झाला.... स्वप्न आमची निरनिराळी पण सोबत असेल जेव्हा एकमेकांची, तर गाठू आम्ही ती आपली स्वप्ने.... एकमेकांना देऊ भरपूर प्रोत्साहन आणि देऊ आता, पंखांना एकत्र भरारी....🐤🐤
Posts
Showing posts from August, 2018
Netravali Goa🏕️🏞️
- Get link
- X
- Other Apps
'नेत्रावळी सांगे' 'निसर्गरम्य केरी ' तुम्ही ऐकल असणार, तसच आहे हे ' निसर्गरम्य नेत्रावळी' हिरवीगार शालू नेसलेली ' नेत्रावळी 'सांगे तालुक्यात वसलेली अवती भोवती गार हवा थंड ते वातावरण मनाला उत्साह देई.... सतत बुड बुड करणारी ती 'बुडबुड नदी ' सावरी मैनापी जसे लांबलचक धबधबे छोटी मोठी नळयाची घरे आणि दुर दूर जाणारे वेडे वाकडे रस्ते.... शेती उसाची मळे त्यांची पोटे सांभाळतात, लोक इथले साधे सरळ माणुसकी झळकते त्यांच्यात.... कूळ!गरे तळी ह्या गोष्टी नेत्रावळीची शोभा वाढवी, स्पायस ऑर्किडची फार्म मोठी मोठी...... रबराचे पलांटेशन, डोळ्यांना गारवा देणारे, वॅक्स फ्लॉवर जसे मेण कधी न विरघळणारे उसाचा रस आणि आंबट ती भिंडीची सोले... थंडगार हवा ,झाडाची छाया, दत्तगुफा,महालक्ष्मी ,वेताळ अशी प्राचीन मंदिरे व पांडवांची एक गुफा .... सर्व काही मनमोहक लांब जरी हे गाव असले पण परत परत तेथे जाण्याची इच्छा होते.... त्यात नेत्रावळीचे विशाल अभ्यारण्य व छोट्या मोठ्या झरी थंड व गोड पाणी, शाळा , पंचायत हे मिळून हे नेत्रावळी गाव....
- Get link
- X
- Other Apps
समुद्र🏝️ समुद्राचा काठावर बसून, विचार मी करते, किती हा अपार समुद्र आणि माणूस किती छोटा..... लाटांवर नाचणाऱ्या सुंदर होड्या, काही छोट्या काही मोठ्या, आणि त्यात रंगीबेरंगी रंगाचे लोक आणि ही मंद हवा आणि खारट ते पाणी...... शुभ्र- काळ्या घोड्यावरती लोकांची स्वारी, आणि संध्याकाळचा मावळणरा सूर्य देतो एक अशा, उद्या येऊ नव्याने...... काही गोष्टी डोळ्यांत साठवू तर काही गोष्टी केमेरामध्ये कैद करू आणि समुद्राचा आनंद , प्रत्येक क्षणी नव्याने घेऊ,......🏝️🏖️
- Get link
- X
- Other Apps
उंच उंच डोंगर, मळबाला झेप घेती, रंगी बेरंगी फुलपाखरे, स्वच्छंद बागडती... पावसाळी धुके, मनाची स्फूर्ती वाढवते, मन हे माझे, ' कवियत्री' स्वताला म्हणते.... कोमट अशा वातावरणात, पक्षांचा किलबिलाट, आणि मोरांचा झुंजार तो नाच .... गती हृदयाची वाढवे, नयनी पुषपित करून, डोलणे ते केसांचे, आणि मनात मृदंग चाललेला तो नाच..... निसर्गाची ही साथ, एकटेपणा मिटवी, मन प्रफुल्लित करून कविता छान सुचवी.......
- Get link
- X
- Other Apps
'माणुसकी' अनेक ज्ञाने देणारी, ती माणसे भरपूर वाट्याला येती ... जे खरे असती ते संकटात खंबीर सोबत उभे रहती... भाषणे , ज्ञान, सल्ला अनेक देती पण खंबीर साथ ज्याची, तीच खरी व्यक्ती... संकटात सोडून जाणे , तोडती माणूस जाती, क्रूर , भित्रेपणाचे वस्त्र ते ओढती...... नाते जुळले माणुसकीचे, तर होईल रे प्रगती..... माणसाला माणुसकीचा विसर न कधी पडो... तर राहील सर्वत्र ती सुख शांती.