मी देव पाहिला 🙏 जगत होते बेभान विसरुनी माझे भूतकाळ, ठाऊक होते मला देवाने हे जग घडविल... अस्वस्थ होते मन गेले देवाचा भेटीस देवाला करून नमन बसले होते नदीचा काठी..... चिंतेत मग्न होऊन पाण्यात पाय मी बुडविले, ठरवलं पायांना द्दयचा छान पेडीक्युर.... म्हणून उचलला एक दगड पहिल्याच मुठीत काढला मी एक छानसा दगड पाहते तर काय! हाती आली गजानन महाराजांची एक उत्कृष्ट मूर्ती... मनात आनंदाचा झाला बरसावा उभी होती मित्र माझी मोठ्याने मी गडगडाट हो घातला,' देव भेटला ,मला देव' आनंदाने भरले माझे नयन विघ्न आता जाईल हरून.... मैत्रीण म्हणाली,नको आता चिंता करुस , प्रत्यक्ष सुखकर्ता दुःखहर्ता तुझ्या हातात.... आणखी काय हवे ? सर्वस्व भेटल्याचा अनुभव मला झाला 🙏 होय त्या दिवशी देव मला भेटला आणि देव असल्याचा विश्वास मला बसला..... विचलित ते माझे मन प्रसन्न हो झाले...
Posts
Showing posts from September, 2019